शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात तडफडणा-या आजीबाईला मायेची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:32 IST

लासलगाव : सेंगऋषी वृद्धाश्रमात केले दाखल

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून रखरखीत उन्हामुळे आजीबाईची स्थिती पाहून अनेकांच्या मनात कालवाकालव झाली.

शेखर देसाई, लासलगाव - तापमानाचा वाढता पारा घराबाहेर पडणे मुश्किल करून सोडत असताना रखरखत्या उन्हात लासलगाव जवळील रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आजीबार्इंना लासलगावचे संजय बिरार आणि नवनाथ सेंगऋषी आश्रमाचे संस्थापक नवनाथ जराड यांच्या माध्यमातून मायेचा आधार मिळाला आणि मानसिक संतुलन ढळलेल्या या आजीबार्इंना दोहोंनी बळजबरीने सेंगऋषी आश्रमात दाखल करून घेत त्यांचा वनवास संपवला.नाव गाव माहीत नाही. रखरखते ऊन तरीही रस्ता सोडणार नाही अशी जणू भीष्मप्रतिज्ञा केलेल्या आजीबाई गेल्या दीड वर्षांपासून लासलगाव जवळ रस्त्यावर ठाण मांडुन बसलेल्या येणा-या-जाणाऱ्यांना प्रत्येकालाच दिसायच्या. उन-वारा-पाऊस याचा सामना करणा-या या आजीबार्इंना वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु, आजीबाई काही रस्ता सोडायला तयार नसायच्या. कुणी घेऊन जायला आले की आरडाओरड करणे, काठी मारणे, शिव्या देणे यामुळे आजीबाईचा अनेकांना नाद सोडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रखरखीत उन्हामुळे आजीबाईची स्थिती पाहून अनेकांच्या मनात कालवाकालव झाली. संजय बिरार आणि नवनाथ जराड यांना अनेकांनी फोन करुन आजीबार्इंची अवस्था कळवली आणि त्यांना आश्रमाची किती गरज आहे, याचीही माहिती दिली. आजीबाई एकदम रस्त्यावरच आल्या म्हटल्यावर रात्री-बेरात्री अंधारात अपघाताचाही प्रकार घडू शकतो. त्यामुळे संजय बिरार आणि नवनाथ जराड यांनी मनाचा ठिय्या केला आणि कोणत्याही परिस्थितीत आजीबाईला आश्रमात घेऊन जायचेच असा निर्धार केला. नेहमीप्रमाणे आजीबार्इंनी आरडाओरड केला परंतु, नंतर दम भरल्यावर त्या गाडीत बसायला तयार झाल्या. आजीबार्इंना चालता येत नसल्याने त्यांना उचलूनच गाडीत बसविण्यात आले आणि गाडी आजीबार्इंना घेऊन आश्रमाकडे रवाना झाली. रखरखीत उन्हात तडफडणा-या आजीबार्इंना आश्रमात मायेची सावली लाभली. आजीबाईला आश्रमात आणले तर खरे परंतु, आता त्या आश्रमात किती दिवस राहतात याची चिंता बिरार-जराड यांना लागून आहे. मात्र, त्यांनी त्यांची काळजी वाहायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक