शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

दिवसेंदिवस ढासळतोय पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:13 PM

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्दे सोमेश्वरानंद सरस्वती : ओझोनचा थर होतोय विरळ

त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आहे. त्याचे परिणाम आज आपण सूर्याच्या दाहकतेने भोगत आहोत, असे प्रतिपादन चैतन्य कल्याणकारी संस्थेचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सोमेश्वरानंद सरस्वती बोलत होते. जगातील प्रदूषण वाढल्याने ओझोनचा थर विरळ होत आहे. यासाठी निसर्ग हाच परमेश्वर मानून निसर्गराजाची सेवा करा. ते पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणा शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, महानगर-पालिका आदी एक दिवसापुरता पर्यावरण दिन साजरा करतात. वृक्ष लागवड करतात. तथापि बाकीचे दिवस रिकामे असतात. तेव्हा आपण काय करता असा सवाल विचारून स्वामीजींनी झाडे वृक्षवल्ली निसर्गावर प्रेम करा, आपला परमेश्वर निसर्ग हाच आहे.निसर्गातच श्रीराम, भगवान त्र्यंबकराजा, महाबली हनुमान आदी देवता आहेत. पर्यावरणाचा समतोल सांभाळा. प्रदूषणामुळे अनेक रोगराई जन्म घेतात. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. वृक्षांशी संवाद करावा. त्यांना आपला संपर्क द्यावा. सत्संग करावा.केवळ पर्यावरण दिनाच्यादिवशी आपण एकच दिवस खड्डे खोदतो, वृक्ष लावतो, पाणी टाकतो एवढे काम केले की आपली जबाबदारी आपण पार पाडली, आपली जबाबदारी संपली. त्यानंतर झाडे जगली की वाळून गेलीत हे पाहात नसल्याने त्याचा परिणाम निसर्गावर होत असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल सांभाळा.स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा आश्रम निसर्गरम्य परिसरात बेझे चाकोरे शिवारात आहे. त्यांच्या आश्रमात शंभरेक गोधन आहे. शेळ्या आहेत. चारा खाद्य पाणी भरपुर आहे.एवढेच नव्हे तर पाखरांचा चिवचिवाट सदैव ऐकु येत असतो. कारण भरपुर वृक्षराजी, त्यात आयुर्वेदिक वृक्ष वेली वनस्पती फळझाडे लावलेली आहेत. महणुनच येथील वातावरण आल्हाददायक निसर्गरम्य आहे.आश्रमा समोर वन विभागाच्या मालकीचा एक उघडा बोडका डोंगर वजा टेकडी आहे. वन विभागाने काही वर्षे आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही हा डोंगर वृक्षराजीची लागवड करु न हरित डोंगर करु न दाखउ. आम्हाला मालकी हक्क नको किंवा मालकी हक्कही सांगणार नाही. अर्थात हा प्रश्न वनविभागाचा आहे. निदान वनविभागाने तरी वृक्षारोपण करु न झाडांचे संगोपन करावे.आज सर्वत्र प्रदुषण वाढले आहे. कारखान्यांच्या चिमण्या आकाशात प्रुषण सोडतात. कारखान्यांचे केमिकल मिश्रीत दुषित पाणी रसायन नदीपात्रात सोडले जाते. आण िसंपुर्ण नदीच प्रदुषित होत असते. आण िपुढे तेच पाणी लोक पितात आण िगॅस्ट्रो डायरिया त्वचारोग टायफॉईड आदी रोग होत असतात. केवळ प्रदूषणामुळे हे दुष्परिणाम होत असतात.केवळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प हाती घेतला तरी खड्डे खोदण्यापासुन ते झाडांचे संगोपन करणे राखण करणे वगैरे काम वर्षभर जरी चालले तरी गोरगरीब मजुर पोट भरु शकेल. असा सिद्धांत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी मांडला. या संदर्भात स्वामींनी शेवटीनिसर्ग आपली माय माऊली ।कल्पवृक्षाची ही गार सावली ॥प्रेम जिव्हाळ्याची आम्हा वाट दाविली ।भावे जगतो आम्ही ही नामावली ॥धर्म संस्कृतीचे दिले आम्हा दर्शन ।निसर्ग माझा सत्य सगुण आण िनिर्गुण ॥निसर्ग माझा प्राण या सृष्टीचा ।ही पावन राजा आमुच्या हृदय मंदीराचा ॥हनुमंतदास म्हणे निसर्ग राजाला जाऊ या शरण ।हाच प्राण पिता करील आपुले रक्षण ॥