शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यातील डोंगरगावची कन्या झाली तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:05 IST

जळगाव नेऊर : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल लागला असून, त्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव हे मूळगाव असलेल्या व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या ऋ तुजा प्रकाश पाटील हिने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात विकासाची कामे करण्याची इच्छा

जळगाव नेऊर : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल लागला असून, त्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव हे मूळगाव असलेल्या व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या ऋ तुजा प्रकाश पाटील हिने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे.ऋ तुजाने कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता घरीच अभ्यास केला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास तिने सातत्याने चालू ठेवत नुकत्याच झालेल्या परीक्षांमधून तिने मोठे यश मिळविले.ऋ तुजा एचपीटी कॉलेजमध्ये २०१७ साली बी.ए. झाल्यानंतर २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये मुलाखतीपर्यंत मजल मारली. आणि २०१९ साली दुसऱ्याच प्रयत्नात तहसीलदारपदी निवडला गेली. ऋ तुजाला मुलाखतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त-७० गुण मिळाले. चार वर्षांपूर्वी ऋ तुजाचे वडील प्रकाश पंढरीनाथ पाटील (मोटार वाहन निरीक्षक) यांचा भुदरगड किल्ला, कोल्हापूर येथे सहकुटुंब फिरायला गेले असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता.प्रतिक्रि या....वडील सरकारी अधिकारी होते त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. ते म्हणत असत, लोकोपयोगी कामे करता येतील व त्यातून त्यांचा आदर मिळेल अशी नोकरी असावी आणि त्यासाठी सरकारी अधिकारी होणे हाच उत्तम मार्ग आहे. आज त्यांची व आईची इच्छा पूर्ण करता आली याचा अतिशय आनंद होत आहे. पुढे चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात विकासाची कामे करण्याची इच्छा आहे.- ऋ तुजा पाटील(फोटो २२ ऋ तुजा)

टॅग्स :Studentविद्यार्थीGovernmentसरकार