शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळला विवाह मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:02 IST

आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात बुधवारी (दि. २९) सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

नाशिक : आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात बुधवारी (दि. २९) सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने तडजोडीसाठी दिलेल्या वेळेत दत्तू व त्याची पत्नी आशा दोघांचे वकील यांच्यात समेट होऊन दत्तूने विवाह न्यायालयात मान्य केला.नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या आशा दत्तू भोकनळ यांनी १६ तारखेला त्यांचे पती दत्तूविरुद्ध फसवणूक व छळ केल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात केली होती. आशा यांनी फिर्यादीत दत्तू यांच्यासोबत २२ डिसेंबर २०१७ साली खेड तालुक्यातील आळंदी येथे जय अंबे मंगल कार्यालयात हिंदू धर्म वैदिक पद्धतीने विवाह दोघांच्या सहमतीने केल्याचे म्हटले होते. ३ फेबु्रवारी २०१९ रोजी दत्तू यांनी आशा यांच्या आडगाव येथील घरी येऊन ९ फेब्रुवारी रोजी गावाकडे पुन्हा लग्न करायचे ठरविले व दोघांनी कुटुंबीयांना माहिती दिली. १० हजार रुपये आगाऊ देऊन चांदवडमधील एक लॉन्स आशा यांच्या कुटुंबीयांनी नोंदविले. मात्र ७ फेब्रुवारी रोजी दत्तू यांनी फोनवरून लग्न करणार नसल्याचे कळविल्याचे फिर्यादीत आशा यांनी म्हटले होते. १३ व १४ तारखेला दत्तू यांनी पुन्हा घरी येऊन वाद घालत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. पुन्हा २४ तारखेला संगमनेर येथे एका लॉन्समध्ये लग्न करण्याचे त्यांनी मान्य केले आणि आशा यांच्या वडिलांनी संगमनेर येथे जाऊन लॉन्स बुक केले व लग्नाची पुन्हा तयारी केली. पुन्हा दत्तू याने फोनवरून लग्नास येण्यास नकार दिला. त्यामुळे आशा भोकनळ यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून १६ मे रोजी दत्तूच्या विरोधात फिर्याद दिली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी सुरू झाली. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अ‍ॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अ‍ॅड. अर्चना शर्मा यांनी आपापसात तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तूने विवाह मान्य केला. न्यायालयाने अटी व शर्तीच्या अधीन राहून दत्तूला जामीन दिला.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक