शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

विठेवाडी ग्रामपंचायतीवर ‘दत्तकृपा’, दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:19 IST

Gram Panchayat Election Result : अत्यंत चुरशीच्या झालेल्या विठेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर दत्तकृपा झाली असून दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या असून विरोधी गुरुदत्त पॅनलला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

पंडित पाठक - नाशिक -अत्यंत चुरशीच्या झालेल्या विठेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर दत्तकृपा झाली असून दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या असून विरोधी गुरुदत्त पॅनलला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दत्त कृपा पॅनलचे नानाजी केदा पवार यांनी( १०९६) मते मिळवीत गुरुदत्त पॅनलचे शरद सुकलाल पवार(१0८९) यांचा पराभव करीत विजयश्री प्राप्त केली आहे. निवडणूकीत गुरुदत्त पॅनल व दत्तकृपा पॅनलच्या उमेदवारांमध्ये समोरासमोर लढत झाली या लढतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत दत्तकृपा पॅनलचे नानाजी केदा पवार हे विजय प्राप्त केला असून सदस्य पदाच्या निवडणूकीत दत्त कृपा पॅनलला ११ जागा पैकी ९ जागांवर विजश्री प्राप्त झाली आहे. तर गुरुदत्त पॅनलला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

वार्ड निहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढील प्रमाणे वार्ड नंबर १) - भाऊसाहेब केदा पवार (२३८), सुनंदा विठोबा (२७९), वार्ड नंबर २)- केवळ पंडीत पवार (३३०), भारती विलास पवार ( ३४०), इंदूबाई भास्कर निकम ( ३८४ ), वार्ड नंबर ३) - बापू काळू जाधव (३५६), राहुल बापू निकम (३४४), हे दोन्हीही उमेदवार गुरुदत्त पॅनलचे विजयी झाले आहेत.पल्लवी सुनील बोरसे यांनी (३०१) मते मिळवून दत्त कृपा पॅनल मधून विजय प्राप्त केला आहे. वार्ड नंबर ४) - ईश्वर दादाजी निकम ( २८७), सायजाबाई सुरेश गांगुर्डे (३०७), सीताबाई केवळ पवार यांना (२८५ ) मते मिळाली आहेत. विठेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. विठेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दत्तकृपा पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच भास्कर दादा निकम , विलास निकम यांनी केले. निकाल ऐकण्यासाठी तहसीलदार कार्यालयाबाहेर मत मोजणीस्थळी कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीत माजी सरपंच भारती विलास पवार ह्या पुन्हा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंच पद व सदस्य हया दोन्हीही जागेवर निवडणूक लढविणाऱ्या शरद सुकलाल पवार यांना दोन्हीही जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. तर वार्ड नंबर तीन मध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत गुरुदत्त पॅनलचे राहुल बापू निकम व बापू काळू जाधव यांनी विजय प्राप्त केला आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून व फटाके वाजवत आपला आनंद व्यक्त केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक