शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष; रंगी रंगला दत्त पालखी सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 22:11 IST

नाशिक - दंडवत.. दंडवत.. प्रऽभु.. सुखदानी.. सुखदानी नामाचा जयघोष... रंगांची उधळण, न्हाऊन निघालेले हजारो भाविक अन् भक्तीचा जल्लोष, अशा ...

नाशिक- दंडवत.. दंडवत.. प्रऽभु.. सुखदानी.. सुखदानी नामाचा जयघोष... रंगांची उधळण, न्हाऊन निघालेले हजारो भाविक अन् भक्तीचा जल्लोष, अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थ स्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगी रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पन्नास हजारहुन अधिक भाविकांनी दत्त दर्शनाचा  लाभ घेतला आहे.  कोरोनाच्या जागतिक संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळाला.

रंगाची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित असलेली व राज्यातील लाखो महानुभाव पंथीयांचे श्रद्धा स्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रो उत्सवास रंगपंचमी पासून प्रारंभ झाला. पालखी पुढे उधळणारा रंग हा भाविक प्रसाद म्हणून अंगावर घेतात , अशी येथे श्रद्धा  आहे. त्यामुळे हा पालखी सोहळा पाहण्यासाठी व नवस पूर्तीसाठी याठिकाणी राज्यभरातून भाविक दाखल होतात. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महंत मनोहरशास्ञी सुकेणेकरबाबा, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांच्या  हस्ते  देवास विडा अवसर करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मौजे सुकेणेचे सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच सचिन मोगल व सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच याञा समिती व पोलिस प्रशासन उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या विविध भागातून मौजे सुकेणेत दत्त पालखी सोहळयासाठी भाविक उपस्थित होते. चांदोरी व ओणे आणि ओझर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

टॅग्स :Nashikनाशिक