शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला वीज कामगारांची प्रलंबित मागण्यासाठी द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:34 IST

महावितरण कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वतीने मंगळवारी दुपारी तीन ठिकाणी द्वारसभा घेण्यात आली.

नाशिकरोड : महावितरण कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वतीने मंगळवारी दुपारी तीन ठिकाणी द्वारसभा घेण्यात आली.  नाशिकरोड येथील विद्युत भवन, जेलरोड येथील महापारेषण कार्यालय व एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी वीज कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांसंदर्भात द्वारसभा घेण्यात आली. नाशिकरोड विद्युत भवन येथील द्वारसभेत वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, जेलरोड महापारेषण कार्यालय येथील द्वारसभेत अरुण म्हस्के व एकलहरे येथील द्वारसभेत एस. आर. खतिब, हरिष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.  याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्युत मंडळ विभाजनानंतर गठित झालेल्या महावितरण कंपनीचे खासगीकरण व फ्रॅन्चाईसीकरण धोरण रद्द करावे, कर्मचारी, अभियंता, अधिकारी यांना पेन्शन योजना लागू करावी, इपीएफ पेन्शनयोजनेबाबत धोरण निश्चित करावे, कंत्राटी-आऊटसोर्स, सुरक्षारक्षकांना सेवेत कायम करावे, समान काम-समान वेतन करावे, मयत कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, आय.टी.आय बॅच सुरू करावीे, रिक्त जागांवर कामगारांची भरती करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.  द्वारसभेला जी. एच. जाधव, सदाशिव भागवत, सुभाष काकड, नरेंद्र कांबळे, दीपक गांगुर्डे, दीपाली मोरे, प्राची पाटील, पोपट पेखळे, विनायक क्षीरसागर, एस. एन. चौधरी, पी. एस. देवकर, मनोहर वारके, चैतन्य जाधव, गंगा जाधव आदींसह वीज कामगार उपस्थित होते.   कामगारांचे कामाचे तास व जबाबदारी ठरवून देऊन कंत्राटी धोरण रद्द करावे, विविध सहायक पदावर नेमणुकीची पध्दत रद्द करून एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सहायकांना कायम पदावर नियुक्ती द्यावी, फोटो रिडिंग, बिल वाटप, वीज बिल भरणा या महसुलाच्या स्त्रोतामधील कंत्राटीकरण रद्द करून सर्व कामे खात्यामार्फत कायम कामगारांद्वारे करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक