नाशिक : आग्रा येथील पंडित रघुनाथ फाउण्डेशन ट्रस्ट द्वारा संगीत कला केंद्र आणि चंदिगढ येथील प्राचीन कला केंद्र यांच्या वतीने आयोजित संगीत महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत संमेलनात नाशिकचे हार्मोनियनवादक पंडित सुभाष दसककर आणि गायिका शिवानी मारूलकर-दसककर यांना मानाचा ‘कला गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राणी सरोज गौरीहर यांच्या हस्ते दसककर यांनी पुरस्कार स्वीकारला. तीन दिवस चाललेल्या या संगीत महोत्सवात पंडित सुभाष दसककर व शिवानी मारुलकर यांचीही मैफल रंगली. दसककर यांनी गायकी व तंत्रकारी या दोन्ही अंगांचा योग्य समन्वय साधत आपले वादन रंगवत नेले. त्यांना तबला संगत अनुरत्न रॉय यांनी केली. त्यानंतर शिवानी मारूलकर-दसककर यांचे शास्त्रीय गायन झाले. (प्रतिनिधी)
दसककर यांना कला गौरव पुरस्कार प्रदान
By admin | Updated: November 9, 2016 00:53 IST