शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीरोडवर चारचाकीची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:25 IST

दिंडोरीरोडने निमाणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच दिंडोरी नाक्याकडून विरुद्ध दिशेने म्हसरूळकडे जाणाºया दोन चारचाकी वाहनांची शनिवारी (दि़२१) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यासमोर समोरा-समोर धडक झाली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़

पंचवटी : दिंडोरीरोडने निमाणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच दिंडोरी नाक्याकडून विरुद्ध दिशेने म्हसरूळकडे जाणाºया दोन चारचाकी वाहनांची शनिवारी (दि़२१) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यासमोर समोरा-समोर धडक झाली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार (एम. एच. ०४, ईएच ४०१) म्हसरूळ बाजूने पंचवटी पोलीस ठाण्यासमोरून जात होती़ यावेळी दिंडोरीनाक्याकडून भरधाव आलेल्या चारचाकी (एमएच १५, डीएम ३१३) व स्विफ्ट यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामुळे झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक व पोलिसांनी धाव घेत जखमीचालकांना कारबाहेर काढून रुग्णालयात हलविले़  दरम्यान, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चालकही जखमी झाले आहेत़ यापैकी एक चालक गंभीर असून, त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ अपघातानंतर काही काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती़  दरम्यान, दिंडोरीरोड, पेठरोड भागात नेहमीच वर्दळ असल्याने वारंवार अपघात होतात. शहराच्या बाहेरून कोणार्कनगर परिसरातून बायपासरोड असतानाही अवजड वाहनेदेखील शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या पंचवटी भागातूनच जातात. त्यामुळे निमाणी, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, पेठरोड, मेरी-म्हसरूळ या भागांत वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात