शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दारणाकाठ भयमुक्त : जाखोरी, राहुरीत दोन बिबटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 15:19 IST

राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांचा आकडा दहा मानवी हल्ले करत ठार मारणारा बिबट्या नर असल्याचा निष्कर्ष

नाशिक : पश्चिम वनविभागाकडून मागील महिनाभरापासून युध्दपातळीवर दारणानदीच्या खोऱ्यालगत वसलेल्या नाशिक तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये बिबटे जेरबंद करण्याची मोहीम राबविली जात आहे. बुधवारी (दि.५) पहाटे जाखोरी, राहुरी या दोन गावांमध्ये एक प्रौढ नर व मादी बिबट्या पिंज-यात अडकला. महिनाभरात या भागात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांचा आकडा आता दहा झाला आहे.दारणा नदीकाठालगत २ जुलैपासून वनविभागाने बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली. दोनवाडे पासून ते बाभळेश्वरपर्यंत वीस पिंजरे आणि ३५ ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहे. तेव्हापासून या भागातील विविध गावांमध्ये सातत्याने बिबट्या जेरबंद होत आहे. बुधवारी पहाटे जाखोरीत दराडे यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात प्रौढ मादी जेरबंद झाली. तसेच राहुरी गावात निवृत्ती सांगळे यांच्या पेरूच्या बागेत लावलेल्या पिंज-यात पहाटेच्या सुमारा अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचा नर बिबट्या अडकला. घटनेची माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, विजय पाटील, प्रवीण राठोड यांनी धाव घेत जेरबंद झालेल्या बिबट्यांचे पिंजरे सुरक्षितरित्या हलविले....म्हणून नर बिबटे बोरिवलीला कैदेतदारणाकाठालगतच्या जेरबंद केलेले प्रौढ नर बिबटे बोरिवलीच्या संजय गांधी  उद्यानात पिंजराबंद ठेवण्यात येत आहे. अद्याप पाच बिबटे या उद्यानात नाशिकमधून रवाना झाले आहेत. हैदराबाद येथील पेशी व आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) प्रयोगशाळेच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार मानवी हल्ले करत ठार मारणारा बिबट्या नर असल्याचा निष्कर्ष काढला आहे. राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार पडताळणी करत बिबट्या नरभक्षक झाला आहे किंवा नाही? हे ठरविले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव