शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दारणाचे पाणी थांबवले; ३५ टक्के तुटीची भीती

By श्याम बागुल | Updated: November 5, 2018 18:49 IST

नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देजायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.१ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले,

नाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला दारणा धरणाचा विसर्ग सोमवारी सायंकाळी थांबविण्यात आला. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी ८.९ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाने सदरचे पाणी सोडण्यात आले असले तरी, वाहनातील तूट लक्षात घेता जायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध दोन्ही जिल्ह्यांमध्ये आंदोलने होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडणे भाग पडले. गुरुवार १ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले, परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास महामंडळाने स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातून सोडावयाचे ३.१४ टीएमसी पाणी दारणा धरणातूनच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भावली व मुकणे धरणांतून दारणा धरणात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यासाठी पाणी सोडत असताना या पाण्याची चोरी टाळण्यासाठी गोदावरीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच कोल्हापूर बंधाऱ्यांचे निडल्स काढून जागोजागी पोलीस बंदोबस्तात पहारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गेल्या पाच दिवसांत ३.१४ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, पाण्याच्या वहनातील तूट व जागोजागी कोल्हापूर बंधाºयात फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या प्रकारामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतून ८.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात जायकवाडीत त्यापैकी जेमतेम ६५ टक्केच पाणी पोहोचू शकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३५ टक्के पाण्याची वहनात गळती व काही ठिकाणी पाण्याची चोरी झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक