शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 09:14 IST

सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देदहा दिवसांत दुसरा बिबट्या पिंज-यातबिबट्या भक्ष्याच्या शोधात पहाटे पिंज-यात अडकला

नाशिक :नाशिक तालुक्यातील दारणाकाठालगतच्या दोनवाडे ते बाभळेश्वरपर्यंतच्या पंचक्रोशीत महिनाभरापासून बिबट्या या वन्यप्राण्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाच्या पथकाकडून या भागात सुमारे १७ पिंजरे तैनात करून विविध प्रयोग राबवित कौशल्यपणाला लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात होते, अखेर वनविभागाला सोमवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास यश आले. सामनगावात बाभळीच्या वृक्षांच्या मध्यभागी लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला.सामनगावातील पोलीस पाटील मळ्यात राहणारे एकनाथ जगताप यांच्या घराच्या अंगणात खेळणा-या ओम विष्णू कडभाने (४) या चिमुकल्यावर बिबट्याने २८ जून रविवार रोजी हल्ला केला होता; सुदैवाने या हल्ल्यात ओमचे प्राण वाचले. या पाटील मळ्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बळवंत मुरलीधर जगताप यांच्या गट क्रमांक-८१लगत लावलेल्या पिंजºयात अखेर बिबट्या पहाटे भक्ष्याच्या शोधात अडकला. पिंज-यात बिबट्या गुरगुरूत डरकाळ्या फोडू लागल्याने सकाळी शेतावर जाण्यासाठी निघालेल्या गावकऱ्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. पिंजºयात बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, विजय पाटील यांचे पथकत तत्काळ सामनगावात पोहचले. काही वेळेतच नाशिक पश्चिम वनविभागाचे वन्यप्राणी रेस्क्यू वाहनासह चालक प्रवीण राठोड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा तत्काळ घटनास्थळावरून वाहनाद्वारे वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या हलविला. बिबट्या सुस्थितीत असून त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. तुर्तास या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार नसल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजते.दहा दिवसांत दुसरा बिबट्या पिंज-यातदारणाकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा धूमाकूळ सुरू असून ३८ ट्रॅप कॅमेरे आणि २० पिंजरे या भागातील विविध बिबट प्रवण गावांच्या क्षेत्रात वनविभागाकडूत तैनात करण्यात आले आहे. २ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जाखोरीत बबलू सय्यद यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात बिबट्याची मादी जेरबंद झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव