पेठ : अतिशय प्रतिकूल आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीवर मात करून फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षेत पेठ तालुक्यातील ५१ विद्यार्थानी राष्ट्रीय व राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून जि.प. शाळा इनामबरी येथील नैना कोंडाजी भोये हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत सातवा क्र मांक पटकावला आहे.पेठ तालुक्यात दऱ्याखो-यात ज्ञानदान करणा-या शिक्षकांनी कोणत्याही खाजगी क्लासेसची सुविधा नसतांना आदिवासी मुलांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करून शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षामध्ये सुयश संपादन करण्यास मदत केली आहे. पुर्व माध्यमिक (पाचवी) परिक्षेत ४२ तर माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत ९ मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. यामध्ये झनामबारी, निरगूडे, घनशेत, पेठ नं.2, भायगाव, शिंदे, हातरु ंडी,कुळवंडी, माध्यमिक विद्यालय भायगाव यासह अतिदुर्गम शाळांचा सहभाग आहे.आंबेगण शाळेचे सुयशजिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगण येथील ९ मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. नितल गायकवाड व ऋतुजा पागे यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत तर मुक्ता पागे, स्नेहा गायकवाड, किरण कोतवाल, रु पाली पागे, पुनम गायकवाड, सुयश गायकवाड, पंकज गायकवाड यांनी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तर जालखेड शाळेतील उत्कर्ष मोरे, समीर थेटे, साई मोरे यांनी सुयश संपादन केले. वर्गशिक्षक नितांजली भोये, सुभाष कामडी, श्रावण भोये, यांचे मुलांना मार्गदर्शन मिळाले.
आदिवासी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:08 IST
पेठ तालुका : ५१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
आदिवासी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
ठळक मुद्देजि.प. शाळा इनामबरी येथील नैना कोंडाजी भोये हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत सातवा क्र मांक पटकावला आहे.