मुंबई-आग्रा महामार्गावरील बसथांबे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:14 AM2018-05-30T00:14:52+5:302018-05-30T00:14:52+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

 Dangerous on the Mumbai-Agra highway is dangerous | मुंबई-आग्रा महामार्गावरील बसथांबे धोकादायक

मुंबई-आग्रा महामार्गावरील बसथांबे धोकादायक

Next

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.  सदरचे बसथांबे हे पूर्वी महामार्गावर होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर या मार्गावर तीन दुभाजक टाकले आहेत. हे दुभाजक टाकताना दोन्ही सर्व्हीस रस्त्यांच्या बाजूने हनुमाननगरपासून जत्रा हॉटेलपर्यंत लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत. शहर वाहतुकीच्या बसेस या सर्व्हीस रोडने धावत असल्या तरी एक बाजूने प्रवाशांना प्रवाशांना बस पकडण्यासाठी या जाळ्यांवरून उडी मारून बस पकडावी लागते. तसेच महिलांना जाळी ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागते. या थांब्यावर स्थानिक नागरिक, एच.ए.एल.चे कर्मचारी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांची सदैव वर्दळ असते. बस आल्यानंतर पकडण्यासाठी एकच झुंबड उडत असल्याने अनेक जण जाळ्यांवरून पडून जखमी होतात. तसेच सर्व्हिस रोडवरील वाहनांना या गर्दीमुळे अडथळा येऊन अपघातही होतात.  पालकांना यामुळे आपल्या शालेय पाल्यांना सोडण्यासाठी हनुमाननगर किवा जत्रा थांबा येथे जावे लागते. यामुळे अंतर तर वाढतेच, पण या दोन्ही थांब्यांवर वाहतुकीची गर्दी होते. दुभाजकांमुळे दुखापती होण्याची व मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. त्यामुळे येथील बसथांबे अडचणीचे ठरत आहे.
रिक्षाचालक घेतात फायदा
महामार्गारील या बसथांब्यावर लोखंडी दुभाजक ओलांडणे वयोवृद्ध, महिलांना अडचणीचे ठरते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने रिक्षाने जावे लागते किंवा काही किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या बसस्थानकावर बस पकडण्यासाठी जावे लागते त्यामुळे या परिस्थितीचा रिक्षाचालकांकडून गैरफायदा जास्तीची भाडे आकारून लूट केली जाते.

Web Title:  Dangerous on the Mumbai-Agra highway is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.