नांदूरशिंगोटे: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होवूनही पावसाने दडी मारली आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून महिन्याचे पंधरा दिवस उलटूनही अद्यापही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता जूनमध्ये ही ‘जैसे थे’ आहे. पशुपालकांना शेळया-मेंढयांना सांभाळणे जिकिरीचे झाले असून हिरवा चाºयाअभावी शेळ्या-मेंढ्यांना कडुनिंबाच्या पाल्याचा आधार घ्यावा लागत आहे.दर वर्षी जून महिन्यात े पावसाची जोरदार हजेरी लागत असल्याने चोहीकडे हिरवळ निर्माण होत असते.यंदा निम्मा जून उलटूनही काही ठिकाणी पाऊस जोरदार, तर काही ठिकाणी बरसला नाही त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात खरीपपूर्व मशागतीचे कामे सुरू असून शेती कामांना वेग आला आहे. बळीराजा गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाचे चटके सहन करत आहेत. काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र सध्या पावसाची वाट बघत आहेत. जोरदार पाऊस न झाल्यास नदी, नाले, बंधारे कसे भरणार, हा प्रश्न आहे. या वर्षी दुष्काळाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. दुष्काळामुळे चारा व पाणी टंचाई कायम आहे. शेतकरी व पशुपालकांना जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. ठिकठिकाणी विहिरींना तळ गाठला असून, प्रशासनाला पावसाळ्यातहीटॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात दुष्काळाची तीव्रता जूनमध्येही ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 18:36 IST