शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:49 IST

देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : उत्पादनावर परिणाम शक्य

अवकाळी पावसाने कंबर मोडलेला बळीराजा हिवाळ्यात काहीतरी साध्य होते का, यासाठी कष्ट करत असताना आता त्याही पिकांवर ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या ढगाळ हवामानामुळे पार कोलमडून गेला आहे. आत्ताच कुठे आंब्याला मोहर फुलायला सुरुवात झाली होती. आंब्याचा मोहर बाहेर पडतो न पडतो तोच ढगाळ हवामानामुळे मोहर गळून पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून हवामान बदलाने कहर केला असून, काही ठिकाणी ढगाळ तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या मोहराच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहर फुलण्यास सुरुवात होते. मोहराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो; परंतु ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलामुळे मोहराचे नुकसान झाल्याने आंबा उत्पादन संकटात सापडले आहे. या वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहर पावसामुळे गळायला सुरुवात झाली असून, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. यामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर काही ठिकाणी काळपट पडला आहे. हापूस, केशरी, राजापुरी आदी प्रकारच्या आंब्यांच्या झाडांचा मोहर ढगाळ वातावरणामुळे गळून पडल्याने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागली आहे. वातावरणीय बदलांमुळे गळून पडत असलेला आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMangoआंबा