शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

माकपासाठी धोक्याची घंटा

By admin | Updated: February 25, 2017 00:09 IST

माकपासाठी धोक्याची घंटा

श्याम खैरनार : सुरगाणाजिल्हा परिषदगट व पंचायत समिती गणात माकपाने वर्चस्व राखले असले तरीही हट्टी गट व गणात कमळ फुलल्याने तसेच भवाडा गटात शिवसेना उमेदवारांकडून कडवे आव्हान देण्यात आल्याने गोंदूणे गट वगळता भविष्यात भवाडा व हट्टी गटात माकपासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.  भवाडा व गोंदूणे गटात माकपा,राष्ट्रवादी कॉग्रेसकडून बाहेरचे उमेदवार देण्यात आले. गोंदूणे गट व गणात माकपा कडून कोणीही उमेदवार असो तो निवडून येतोच ही सत्यता आहे. मात्र या निवडणूकीत गोंदूणे गट वगळता भवाडा व हट्टी गटात माकपपुढे आव्हान निर्माण झाले होते. गटातील भाजप उमेदवार व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती यांना घाटमाथ्यावरिल मते कमी मिळाल्याने त्यांचा ३८७ मतांनी झालेला विजय निसटता आहे. भविष्यात भाजपसाठी या गटात सोनं करण्याची संधी आहे. हट्टी गणात भाजपचेच एन.डी.गावित निवडून आले. गेल्या निवडणूकीत ते गोंदूणे गटातून पराभूत झाले होते. मागचा अनुभव लक्षात घेत यावेळी माकपाप्रमाणेच नियोजनबद्ध रणनिती अवलंबल्यानेच त्यांचा विजय झाला आहे. एन.डी. गावित यांचेही त्यातयोगदानआहे. हा विजय भाजपसाठी महत्वपूर्ण समजला जात आहे. माकप उमेदवार व माजी उपसभापती सावळीराम पवार यांचा १६२४ मतांनी पराभव झाला आहे. शिवसेनेने हाती असलेला एकमेव बोरगाव गण देखील गमावला आहे. चौरंगी लढतीत मत विभागणीमुळेसेनेचा पराभव झाला. मतविभागणी होणार नाही याची काळजी घेतली असती तर येथे पुन्हा शिवसेनेने बाजी मारली असल्याचेबोललेजातआहे. बोरगाव गणातील चौरंगी लढतीत माकप उमेदवार सुवर्णा गांगोडे विजयी झाल्या. हा एकमेव गण शिवसेनेकडे होता.  पहिलीच निवडणूक लढवत असलेल्या सोनालीराजे यांनी कार्यकर्त्यांच्या साथीने चांगलीच लढत दिली. मात्र पवार यांचा पराभव झाला. भवाडा गटात माकप विरोधात स्थानिक भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस युती झाली असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे बाहेरील उमेदवार दिला. या उमेदवाराला केवळ ४०१ मते मिळाली. याठिकाणी सहा उमेदवार होते. माकप व शिवसेना उमेदवार वगळता उर्वरीत उमेदवारांना नगण्य मते मिळाली. सहा पैकी दोन अपक्ष उमेदवार माकप पुरस्कृत होते. दोन्ही अपक्षांना मिळून ४३५ मते मिळाली. भवाडा गटात नोटाला तब्बल १०८१मते पडली. त्यातहीभवाडा गटात निर्माण केलेले अस्तीत्व सेनेसाठी लाखमोलाचे समजले जाते.  शिवसेनेकडील बोरगाव गण माकपने हिरावला आहे. तर हट्टी गट व गणात कमळ फुलले आहे. गोंदूणे व भवाडा गटात माकपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. गणात विजय घांगळे यांना माकपने निवडून आणले. येथे भाजपचे उमेदवार सुरेश चौधरी यांना दोन नंबरची मते मिळाली. पळसन गणात एकास एक लढत होऊनही येथे शिवसेना उमेदवार अंजना वार्डे यांचा पराभव झाला.  भवाडा गणात माकप उमेदवार मनिषा महाले कडून अपक्ष उमेदवार भारती धूम यांचा केवळ ५८१ मतांनी पराभव झाला. येथील लढतही चांगली झाली. त्यामुळे भविष्यात पुढील निवडणूकीत माकपला लक्ष घालावे लागणार आहे. भदर गणात एकास एक लढत झाली. आमदार जे.पी.गावित यांचे पुत्र इंद्रजित सर्वाधिक मतांनी निवडून आले. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाळू गावित यांचा पराभव झाला. यापुढे गणात राष्ट्रवादीला चांगली तयारी करावी लागणार आहे.