शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:47 IST

नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्देनटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीचे रजत महोत्सवी वर्षलखनौ घराण्याच्या खास गुरू-शिष्य परंपरेतून रास ताल कीर्ती कलामंदिराच्या वतीने ‘नृत्यानुष्ठान’

नाशिक : कथ्थक कलेचे गुरू पंडित नंदकिशोर कपोते यांच्या शिष्या व प्रसिद्ध नृत्यांगणा नीलिमा हिरवे यांनी विविध पारंपरिक रचनांनी सजविलेला १३ मात्रांचा रास ताल, तर लखनौ घराण्याच्या खास गुरू-शिष्य परंपरेतून पंडित विजय शंकर यांच्या शागीर्द नृत्यांगणा शीला मेहता यांनी सादर केलेला रास ताल कलाविष्काराने नृत्यानुष्ठानाच्या माध्यमातून रसिकांना एकल कथ्थक नृत्याचा सौंदर्यानुभव दिला.निमित्त होते, परशुराम सायखेडकर सभागृहात रविवारी (दि.११) रंगलेल्या ‘नृत्यानुष्ठान’चे. नटराज पंडित गोपीकृ ष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. कथ्थक नृत्याविष्काराच्या सहाव्या पुष्पाला कलाप्रेमींनी रविवारी (दि.११) उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. हिरवे यांनी प्रारंभी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर त्यांनी थाट, आमद, परण, त्रिमलू, तत्कार या पारंपरिक रचनांनी १३ मात्रांचा रास तालचे खास शैलीत सादरीकरण केले. सुरदासांच्या तीन दोह्यांनी कृष्णाच्या मुरलीविषयी असुया असणा-या गोपिकांच्या व्यथा त्यांनी आपल्या दुस-या नृत्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना पराग हिरवे (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), श्रीपाद लिंबेकर (गायन), ऋतुजा जोशी (पढत) यांनी साथसंगत केली.

 

टॅग्स :danceनृत्यNashikनाशिक