शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पटचे आमिष; महिलेला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:04 IST

ग्रीन अ‍ॅपल कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन करून दोघा भामट्यांनी मागील वर्षी आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत एका महिलेला दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास ताब्यात घेतले आहे.

नाशिक : ग्रीन अ‍ॅपल कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन करून दोघा भामट्यांनी मागील वर्षी आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत एका महिलेला दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास ताब्यात घेतले आहे.सिमरण राकेश शर्मा (३२,दिंडोरी नाका) यांना ८ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत संशयित आरोपी संतोष माणिक आगवणे, प्रकाश बोंबले या दोघांनी दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून सुमारे साडेचार लाखांची फसवणूक केली. सिमरण शर्मा यांच्या फिर्यादीवरून संशयित संतोष माणिक आगवणे (रा. कदम मेन्शन) व प्रकाश बोंबले यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित आगवणे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.महात्मानगर परिसरात दोघा संशयितांनी ग्रीन अ‍ॅपल कॉर्पोरेशन कंपनी स्थापन केली. संशयितानी नागरिकांना पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. तर काहींना दरमहा दहा टक्के व्याज देण्याची भूलथाप दिली. काही नागरिकांनी आमिषाला बळी पडून पन्नास हजारांपासून ते पाच लाखांपर्यंतची रक्कम संशयितांच्या कं पनीत गुंतविली. शर्मा याच दामदुपटीच्या आमिषाला बळी पडल्या.भामट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच शर्मा यांनी संशयितांविरोधात शनिवारी (दि.२६) गंगापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. यातील मुख्य संशयित आगवणे याला ताब्यात घेतले तर त्याचा दुसरा साथीदार बोंबले हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या गुन्ह्यात तक्रारदार वाढण्याची शक्यता असून, संशयितांनी अनेकांना अशाप्रकारे गंडा घातला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आगवणे याने यापूर्वीदेखील मुंबईत अशा पद्धतीने नागरिकांना फसविले असून, त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक