शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:32 IST

नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले. नुकसानीचा हा प्राथमिक अहवला असून यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्राथमिक अहवालात ५६ जनावरे दगावली १९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले. नुकसानीचा हा प्राथमिक अहवला असून यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.जोरदार वादळीवाºयासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यात नुकसान मालमत्ता आणि पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. जोरदार वाºयाच्या वेगाने शेतपीक भुईसपाट झाले तर पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने त्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाणही अधिक आहे. सिन्नर तालुक्यात १३८ हेक्टरवरील शेतपीक वाया गेले, तर नाशिक, दिंडोरी, इगतपुरीतील अनेक भागांतील पिकांना पावसाचा फटका बसला. येवला तालुक्यातदेखील मोठ्या पावसाने दाणादाण उडविली. या ठिकाणी १४ घरांची पडझड झाली तर तीन जनावरे दगावली. सिन्नर तालुक्यातही ३० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले.बागलाण तालुक्यात सर्वाधिक ३६ जनावरे दगावली, तर कळवणला ५, नांदगाव २, दिंडोरी, चांदवड, निफाड, मालेगाव, सिन्नरला प्रत्येकी १, येवला येथे ३, नाशिक तालुक्यात ५ याप्रमाणे जनावरे दगावली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, पॉली हाउस, शेडनेट, पोल्ट्री, गोठे तसेच कांदाचाळीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा सुमारे २१ घटना घडल्या असून, यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, वादळवारा आणि जोरदार पावासाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. तहसीलदारांनाही सतर्कतेच्या सूचना देत आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्जता बाळगण्यचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी