समृद्धी महामार्ग हा इगतपुरी मतदारसंघातून ४० किमी इतका गेलेला असून, यात इगतपुरी मतदारसंघातील एकूण २३ गावे आहेत. मात्र, या महामार्गाचे भूसंपादन होत असताना शेतकऱ्यांना रेडीरेकनर प्रमाणे भूसंपादनाची किंमत मिळालेली नाही. इगतपुरी तसेच नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील बागायती जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या आहेत. उर्वरित जमिनींवर येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असताना या कामामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्यातच अशा नुकसानीला सामारे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समृद्धी महामार्ग अधिकाऱ्यांनी पिंपळगाव डुकराचे सरपंच भगवान वाकचौरे, नारायण भगत, दत्तू सहाने, कचरू पाटील डुकरे, कचरू वाकचौरे, मल्हारी मांडवे आदी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेत तोडगा काढला.
इन्फो
१५ दिवसांत सर्व्हे
समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे नुकसान झाले असेल त्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्व्हे करण्यासाठी किमान १५ दिवस लागतील. त्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाइपलाइनची दुरुस्ती समृद्धी महामार्गाकडून करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सरपंच भगवान वाकचौरे व उपस्थित शेतकऱ्यांसमोर दिले. लेखी आश्वासनानंतर समृद्धीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.
कोट...
समृद्धी महामार्गासाठी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून, उर्वरित जमिनींवरच येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. समृद्धीच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची दिलेल्या लेखी आश्वासनानंतर दुरुस्ती न झाल्यास शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- भगवान वाकचौरे, सरपंच, पिंपळगाव डुकरा
-----------------------
फोटो- २७ समृद्धी मार्ग
समृद्धी महामार्गामुळे पिंपळगाव डुकरा येथील शेतकऱ्यांच्या पाइपलाइनच्या नुकसानीची दुरुस्ती करण्यात येईल. या आश्वासनाचे पत्र सरपंच भगवान वाकचौरे यांना देताना अधिकारी. समवेत कचरू पाटील डुकरे, पोलीस उपनिरीक्षक डी. एच. वाजे व शेतकरी.
===Photopath===
270121\27nsk_39_27012021_13.jpg
===Caption===
फोटो- २७ समृद्धी मार्ग समृद्धी महामार्गामुळे पिंपळगाव डुकरा येथील शेतकऱ्यांच्या पाईपलाईनच्या नुकसानीची दुरूस्ती करण्यात येईल या आश्वासनाचे लेखी पत्र सरपंच भगवान वाकचौरे यांना देतांना अधिकारी. समवेत कचरू पाटील डुकरे, पोलिस उपनिरीक्षक डि.एच. वाजे व शेतकरी.