शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटचारी फुटल्याने कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:50 IST

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे चणकापूर उजवा कालव्यावरील वितरिका फुटल्यामुळे कांदा पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन कोरोनात शेतक-यास लाखो रूपयांचा फटका बसला असून सदर घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे चणकापूर उजवा कालव्यावरील वितरिका फुटल्यामुळे कांदा पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन कोरोनात शेतक-यास लाखो रूपयांचा फटका बसला असून सदर घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.चणकापूर उजव्या कालव्याला आवर्तन सुरू असतांना कालव्याच्या वितरीकेला मंगळवारी (दि.५ ) पहाटे पाणी सोडण्यात आले होते. परंतु मुख्य कालव्यापासून दिड कि.मी.वर या वितरीकेचा बांध शेतकऱ्यांनी कोरून अतिक्रमण केल्यामुळे कमकुवत झाला आहे. तसेच लगतच्या शेतक-यांनी चारीत झाडे ,झुडपे, गवत आदी कचरा टाकून पाणी प्रवाहास अडथळा निर्माण केल्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला व बांध फुटला. सदर पाणी वाजगाव येथील शेतकरी निवृत्ती देवरे यांच्या काढणीवर आलेल्या कांदा पिकात शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. दिपक देवरे या शेतक-याने पाटचारी फुटल्याचे बघून त्वरित चणकापूर उजव्या कालव्याकडे धाव घेतली व पोटचारीचे दरवाजे बंद करून पाणी रोखले. सदर घटनेची माहिती उपसरपंच दिपक देवरे, पोलीस पाटील निशा देवरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना दिल्यानंतर चणकापूर उजवा कालवा उपविभागाचे सहा.अभियंता निलेश बाविस्कर, चौरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.-----कारवाई करण्याची मागणीपुनंद प्रकल्पातंर्गत चणकापूर उजव्या कालव्यावरील वितरीकेसाठी सोमवारी रात्री पाणी सोडण्यात आले होते. चारी लगतच्या शेतक-यांनी अतिक्र मण करून चारीचे बांध नष्ठ केले. तसेच झाडे ,झुडपे, गवत आदी कचरा टाकून पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण केल्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. परिणामी चारीचे पाणी शेतात शिरले. शेतकऱ्यांना वितरिकेसाठी संपादीत क्षेत्राचा शासनाने मोबदला दिलेला असतानांही शेतकर्यांनी संपादीत क्षेत्रात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्यामुळे पाटचारीचा बांध कमकुवत झाला. संबंधित विभागाने हे अतिक्रमण काढून पाटचारीची स्वच्छता करावी व चारीचे नूकसान करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक