शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पाण्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:14 IST

मालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव : महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सोयगाव येथील शिवरतन कॉलनी-शिवरस्त्यालगत सर्व्हे नं. ४९/१४९/२ येथे बच्छाव यांची शेती आहे. परिसरातून नाला गेला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी शेतात घुसल्याने पावणेतीन एकरावरील उभे मका पीक आडवे झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळली. या घटनेत मका पिकाचे सुमारे एक ते सव्वा लाखाचे, तर विहीर आणि इलेक्ट्रिक मोटरचे दोन ते अडीच लाख असे एकूण तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अयोध्यानगर ते गिरणा नदीत जाणाºया नाल्याची सफाई करून कचºयाची विल्हेवाट लावत असते. मात्र, यंदा महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले.कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतल्यानंतर महापालिका यंत्रणा जागी झाली आणि सांडपाण्याला वाट करून दिली, असे बच्छाव यांनी सांगितले. सफाई करताना नाल्यातून काढलेला कचरा उचलला नाही. एरोमा थिएटरपासून ते गिरणा नदीपर्यंत नाल्याची सफाई करणे गरजेचे आहे. नालेसफाई केली गेली नाही तर एखादा मोठा पाऊस झाल्यास पुन्हा परस्थिती जैसे थे होणार आहे. तलाठी भिसे व कृषी सहायक ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. आयुक्त, तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे.२५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्यातून वाहणाºया सांडपाण्याला वाट न मिळाल्याने हे पाणी अयोध्यानगर, शिवरतन कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले. तसेच बच्छाव यांच्या शेतात घुसल्याने पावणेतीन एकरावरील उभे मक्याचे पीक भुईसपाट झाले.शिवाय शेतातील सिमेंटकाँक्रीटची बांधलेली पक्की विहीर आणि इलेक्ट्रिक मोटरदेखील ढासळली. नुकसानीस महापालिकेचे आयुक्त व संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMalegaonमालेगांव