शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने घराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:23 IST

इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.तसेच नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रूक आदी परिसरात पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर या सतत चाललेल्या संततधारेमुळे नांदूरवैद्य येथे एका घराची भिंत कोसळल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घराच्या बाजूला असलेला वीजपुरवठा करणाºया खांबाचे नुकसान झाले असून, वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) रोजी घडली असून, यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.सदर नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात येऊन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त व्यक्तीने केलीआहे. यावर्षी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी शेतीला पुरेसा व मुबलक पाऊस पडत असल्यामुळे बळी राजाने समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यातदेखील वाढ झाल्याने विसर्गर्ही सुरू आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रहिवाशी असलेल्या नंदाबाई शशिकांत रोकडे यांच्या घराची संततधारेमुळे भिंत कोसळून नुकसान झाले असून, विजेच्या खांबाचेदेखील नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची घटना नांदूरवैद्य येथे घडली आहे. सुदैवाने या भिंतीमुळे व वीजवाहिन्या तुटल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठे झाले आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त महिलेने केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी