त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाके देवगावपैकी धाराची वाडी येथील घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तानाजी शिद, नामदेव बांगारे आदी कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाहणी केली. घरमालक रामा शिवा मेंगाळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊन सर्व कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर येथे येऊन तहसीलदार दीपक गिरासे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांना सांगितला.रामा शिवा मेंगाळ असे या घरमालकाचे नाव आहे. घरात आग लागली त्यावेळी लहान मुले बाहेरच खेळत होती. आगीचे कारण समजू शकले नाही. तांदूळ, किराणा, कपडे, मोबाइल, तेल आदी जीवनाश्यक वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. बांगारे कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आले आहे.
धाराची वाडी येथे आगीत घराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:46 IST