पेठ : तालुक्यातील एकदरे पैकी हेदपाडा परिसरात अचानक आलेल्या वादळी वा-याने एका शेतकºयाच्या घरावरील २० ते २५ पत्रे ऊडून गेल्याने नुकसान झाले. गुरु वारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन सोसाटयाचा वारा सुटला. यामध्ये हेदपाडा येथील काशिनाथ विठ्ठल सापटे यांच्या घराचे पत्र ऊडाल्याने मोठे नुकसान झाले.आधीच कोरोना मुळे आर्थिक चणचण भासत असतांना व लॉक डाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असतांना नुकसानग्रस्त शेतकर्यास शासकिय मदत मिळावी अशी मागणी सदस्य जगन सापटे यांनी केली आहे.-----------हेदपाडा येथील काशिनाथ सापटे यांच्या घराचे झालेले नुकसान. (०८ पेठ १)
वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या घराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:45 IST