शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कांद्याच्या बोगस बियाणांमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:46 IST

पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. ...

ठळक मुद्देपाळे खुर्द : शेतकऱ्याला बारा लाखांचा फटका

पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, पंरतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी सापडला आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.कळवण तालुक्यातील आसोली येथील शेतकरी भीमराव वामन देवरे यांनी २१ सप्टेंबर २०२० रोजी उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या कांदे ८० टक्के टोंगळे व डीरले, पोकळ निघाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.धुळे येथील एका बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रातून घेतलेल्या कांदा बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी देवरे आर्थिक संकट सापडले आहेत. संपूर्ण उन्हाळी हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्नच शून्य होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे त्यांचे उपजीविकेचे साधनच हिरावले गेले आहे.बियाणे खरेदी व शेती मशागतीसाठी नातेवाईकांकडून घेतलेले हात उसनवारीचे पैसे कसे फेडायचे हि विवंचना त्यांना सतावत आहे. तसेच कळवण येथील एका केंद्रातून काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. मात्र लागवड केल्यानंतर ६० ते ७० दिवसानंतर कांद्याच्या पातीला टोंगळे, डीरले निघाल्याने जमिनीत कांदाच तयार झाला नाही. त्यामुळे उत्पन्न निघणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा व बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबत तहसीलदार बी. ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल आहेर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.कोट....माझ्या शेतात २ दोन एकर बियाणाची कांदा लागवड केली आहे. मात्र ६० दिवसानंतर कांद्याला टोंगळे व डीरले निघाल्याने माझे पूर्णतः कांदा पीक वाया गेले आहे. उत्पन्न दोन एकर मध्ये बारा ट्रॅक्टर निघाले असते. चारशे क्विंटल कांदा उत्पन्न झाले असते. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.- भीमराव देवरे, शेतकरी, आसोली.चौकट...अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षदरवर्षी कोणत्या नकोणत्या कारणाने अनेक पिकांची बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी येत असतात. याबाबत शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बोगस बियाणे निघाल्याचे कळताच कृषी विभागाकडे तक्रार केली जाते, मात्र या तक्रारींची कोणतीच दखल न घेता कृषी दुकानदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो. म्हणून वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन संबंधित कृषी बियाणे विक्री केंद्रांवर व दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.कोट...शेतकऱ्याची तक्रार आली आहे. लवकरच कांदा बियाणे संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे कंपनीचे मालक, विक्रेता, तालुका कृषी अधिकारी अशी टीम जाऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.- राहुल आहेर, कृषी अधिकारी, पंचायत समिती.

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी