शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

अतिवृष्टीमुळे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:54 AM

जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देप्राथमिक अहवाल : ३२ हजार शेतकरी बाधित

नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे निफाड आणि इगतपुरी तालुक्यांत झाल्याची नोंद करण्यात आली आहे, तर बाधीत होणाऱ्या घरांची संख्या दिंडोरी तालुक्यात अधिक आहे. दरम्यान, प्राप्त होणाºया अहवालानुसार शासनाकडे तत्काळ मदतीसाठी अहवाल पाठविणार जाणार आहे.जिल्ह्यातील भयंकर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रांताने दिले असून, त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी पथके तयार करून शुक्रवारपासून (दि.९) पंचनामे सुरू केले आहेत. प्राथमिक अहवालात २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची माहिती समोर आली असून, ८८ गावे बाधीत झाली आहे, तर ३२ हजार ४३३ शेतकºयांना शेत नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि धरण क्षेत्रात झालेल्या विक्रमी पावसामुळे धरणातून विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेहोते. एनडीआरफच्या पथकाबरोबरच जिल्हा आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे बाधित झाली, तर शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला. उभी पिके पाण्यात गेल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. दोन ते तीन दिवसांपासून लोक आपल्या घराकडेदेखील परतलेले नाही तर पुराची परिस्थिती भीषण असल्यामुळे लोक अजूनही पुरातून सावरलेले नाही.तालुकानिहाय बाधित झालेली गावे, क्षेत्रप्रांताधिकाºयांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची महिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार नाशिक तालुक्यात ८८ गावे बाधित आहेत, तर २५,७३ हेक्टर पिके बाधित झाली आहेत. इगतपुरीत १२६ गावे, ९३९० शेतकरी बाधीत आहेत, तर १०३४९ हेक्टर पिके पाण्यात गेली आहेत. देवळा येथील सात गावांमध्ये ३४ हेक्टर, पेठ तालुक्यातील १४५ गावांमधील २१२ कुटुंबे बाधित आहेत, तर ३४ टक्के पिके अडचणीत आले आहेत. बागलाणमधील १४५ गावे, २२२ शेतकरी बाधित आहेत. पेठमध्ये ५५९ हेक्टर इतक्या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बागलाणमध्ये ३९ गावे तर ८०७ शेतकरी अडचणीत आहेत. निफाडमध्ये ४९ गावे बाधीत आहेत ६२१७ क्षेत्र, तर ३५०० शेतकरी बाधित आहेत. दिंडोरीत १५६ गावे, ४०० हेक्टर क्षेत्र, ७०० शेतकरी बाधित, त्र्यंबकेश्वर ८६ बाधित गावे आहेत, तर ६२० हेक्टर क्षेत्र तर ८५० शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाणा ३३ गावे ४८ हेक्टर क्षेत्र तर ७४ बाधित शेतकºयांची संख्या आहे. सिन्नर तालुक्यात २८ गावे बाधित असून, ५६१ हेक्टर क्षेत्र, तर ११७६ बाधित शेतकºयांची संख्या आहे. कळवणमधील अवघे गाव बाधित आहे. या गावातील ०.६४ क्षेत्र बाधित आहे, तर ५ शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती