शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 22:11 IST

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भात शेतीसह नागली, वरई व हरभरा, मसूर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू, सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अजूनही पावसाचे सावट कायम असून पावसाची संततधार सुरूच आहे . शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे. बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बहरलेला शेतीमाल वाया जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या बेमोसमी पावसाने घाट माथ्यावर स्ट्रॉबेरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा, करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातून कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.बँकां, सहकारी संस्था, फायनान्सचे व सावकारी तसेच हात उसनवारीने घेतलेले कर्ज शेतकरी कसे फेडणार ? मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व इतर मूलभूत गरजा कशा भागविणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल विभाग व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभरा, कांदा रोपे, गहू ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी