शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

शॉर्टसर्किटमुळे डाळींबबाग खाक

By admin | Updated: April 6, 2017 01:16 IST

भेंडाळी (ता. निफाड) येथील शेतकरी रघुनाथ कमानकर यांच्या गहू लावलेल्या शेतात लागलेली आग डाळींबबागेला लागून नुकसान झाले

 सायखेडा : भेंडाळी (ता. निफाड) येथील शेतकरी रघुनाथ सावळीराम कमानकर यांच्या गहू लावलेल्या शेतात (गट नंबर ४३७) वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे बुधवारी (दि. ५) दुपारी २ वाजेच्या सुमारास लागलेली आग शेजारीच असलेल्या त्यांच्याच डाळींबबागेला लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. याच भागात सात वर्षांपूर्वी तारा तुटल्याने पहाटे घरातून बाहेर पडलेल्या वैशाली विष्णू कमानकर या विवाहितेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या परिसरातील तारा ‘जैसे थे’ आहेत. आज पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने शेतकरी संतापले आहेत.कमानकर यांनी आपल्या एक एकर शेतात डाळींब पिकाची लागवड केली असून, पाण्याची टंचाई असल्याने मोठ्या मेहनतीने डाळींब पीक चांगल्या प्रकारे आले. मात्र काल शॉर्टसर्किटमुळे कापलेल्या गव्हाच्या पिकाला लागलेली आग पसरत जाऊन शेजारीच असलेल्या डाळींबबागेला लागली व या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा लोळ पडलेल्या शेतातील गव्हाची कापणी केलेली असल्याने मोठी आर्थिक हानी टळली. या ठिकाणी वीज वितरणचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भेट देत पंचनामा केला. ऐन दुष्काळात चार वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे कमानकर यांनी सांभाळलेली डाळींबबाग वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे डोळ्यासमोर आगीत भस्मसात झाल्याने शेतीचे कर्ज कसे फेडणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. (वार्ताहर)