शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

डोंगर चढत-उतरत करावी लागतात दैनंदिन कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 8:15 PM

त्र्यंबकेश्वर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात व त्र्यंबकेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील मेटघर किल्ला येथील आदिवासी बांधव रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. मेटघरला जायला अजून पक्का रस्ता नसल्याने दररोज डोंगर चढून-उतरून ग्रामस्थांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वरच्या मेटघरचे आदिवासी पाणी, रस्त्यापासून वंचित

येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दूषित पाण्यावर आदिवासी बांधव आपली तहान भागवत आहे. दूषित पाण्याने वेळप्रसंगी गंभीर आजारांचा त्यांना सामना करावा लागतो. या सर्व गंभीर समस्या पाहता त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे व संपत चहाळे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगास या समस्यांसंदर्भात निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन अनुसूचित जाती-जमाती आयोगाने महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाला याठिकाणी सुविधा देण्यासाठी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आदिवासी विभागाचे निरीक्षक एस.एन. सैंदाणे यांनी त्र्यंबकेश्वरला येथे येऊन महादरवाजा मेटेला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी आदिवासी महिला व नागरिकांनी पाणीप्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न सुटावा, अशी एकमुखी मागणी केली. यावेळी सैंदाणे यांच्याशी सोनवणे व चहाळे यांनी आदिवासी महिलांच्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी महादरवाजा मेटच नव्हे तर मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वाड्या पाडे यांना रस्ते व पाण्याची सोय होणे गरजेचे असल्याची मागणी केली.आमदार हिरामण खोसकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी पाच लाख व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनमध्ये मेटघर ग्रामपंचायतीचा समावेश केला. विहीर, पंप, पाइप यासाठी पाच लाख अशा दहा लाखात मेटघर किल्ल्याचा पाणीप्रश्न सहज सुटू शकेल. विहीर बांधण्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भिलमाळ येथे विहीर बांधून त्यावर जास्त पॉवरचे मशीन बसवून नळपाणीपुरवठा योजना साकार होईल. यावेळी सैंदाणे यांच्यासह सर्वांनी विहिरीच्या जागेची पाहणी केली. याप्रसंगी उमेश सोनवणे संपत चहाळे, उपसरपंच दत्तू झोले, ग्रामसेवक विलास पवार, मोतीराम झोले आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक