ताहाराबाद : विंचूर प्रकाशा महामार्गावर कातरवेलजवळ रात्री एक ते तीनच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. रात्री भक्षाच्या शोधासाठी बाहेर पडलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तोंडाला व पोटाला मार लागून बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठार झालेला नर बिबट्या सुमारे तीन वर्षाचा असावा असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी वनविभागाचे वनपाल पी.एस. खैरनार, वनरक्षक बी.यू. बहिरम यांनी घटनास्थळी पंचनामा करून जागेवर ताहाराबाद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी व जायखेडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खंदारे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर कातरवेल येथील वनविभागाच्या हद्दीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:35 IST