शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:05 IST

भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांच्या बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचाºयांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला.

नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांच्या बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचाºयांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला.  इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत विल्होळी, वाडीवºहे, गोंदे, पाडळी, मुंढेगाव, घोटी या भागात बिबट्याचा वावर आढळतो. भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात सहा महिन्यांचा बछडा मुंढेगाव शिवारातून महामार्ग ओलांडत असताना अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ बिबट्याचे शव महामार्गावरून बाजूला करत रस्त्याच्या कडेला आणून ठेवले. घटनेची माहिती त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना कळविण्यात आली. तत्काळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी-क र्मचाºयांनी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा केला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. बिबट्याचा मृतदेह वन कर्मचाºयांनी तत्काळ ताब्यात घेऊन वाहनातून अंत्यसंस्कारासाठी हलविला. वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासून पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजिवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे, जेणेकरून वाहनचालकांना वन्यजिवांचा वावर असल्याबाबतची माहिती मिळण्यास मदत होईल.महामार्गावर अद्याप फलक लावलेले नाहीतमहामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचे वेग प्रचंड वाढले असून, या भागात वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा वावर असल्याचा सावधानतेचा इशारा देणारे फलकही अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना याबाबत कुठलीही माहिती मिळत नाही. अचानकपणे रात्री, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास बिबट्या, रानमांजर, तरस यांसारखे वन्यजीव महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडतात. महामार्गावरून मार्गस्थ होताना वेगावर नियंत्रण ठेवणे हे वाहनचालकांसह वन्यजिवांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. वाहनचालकांनी वन्यजीव अचानकपणे रस्त्यावर दिसल्यास किंवा वाहनाच्या प्रकाशात त्याचे डोळे लख्ख स्वरूपात चमक ल्यास वेग कमी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अपघातात वन्यजिवांचा बळी जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात