शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दादांची भाईगिरी मोडीत काढणार :  विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:34 IST

अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणाºया वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणा-या वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. दादांची भाईगिरी मोडीत काढण्यासाठी त्यांची कुंडली गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आयमा) च्या वतीने आयोजित बैठकीप्रसंगी उद्योजकांना मार्गदर्शन करताना नांगरे-पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयमा अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणीस निखिल पांचाळ, खजिनदार उन्मेश कुलकर्णी, सेक्रेटरी ललित बूब, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विनायक मोरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या मांडल्या असून, यात प्रामुख्याने बंद कारखान्यांमधून होणाºया चोºया, कामगारांची लूट, युनियनमधील अंतर्गत वाद, महिला कामगारांची सोनसाखळी चोरी तसेच ट्रॅफिक समस्यांबाबतही उद्योजकांनी समस्या मांडल्या. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने काही भागात पोलीस पोहचू शकत नसले तरी आपणही साध्या वेशातील पोलीस आहोत ही भावना ठेवून पोलिसांना सहकार्य केल्यास यातूनही अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.सूत्रसंचालन गौरी कुलकर्णी यांनी तर आभार निखिल पांचाळयांनी मानले.आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे समस्या मांडताना म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे चहा-पाणी व नाष्ट्यांच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कारखाना सुटल्यानंतर कामगार जमा होतात. यानंतर या गाड्यांवर अवैध व्यवसाय सुरू होत असून, असे प्रकार सर्रासपणे औद्योगिक वसाहतीच्या परिसरात घडत आहेत. यामुळेच गुन्हेगारीदेखील वाढली असून, याबाबत पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा अहिरे यांनी व्यक्त केली. यावर पोलीस आयुक्तांनी या घटनेची तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील