शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाविरोधात रेल्वेमंत्र्यांकडे मागणार दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:15 IST

घोटी : मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी घोटी ग्रामपालिका हद्दीतील जवळपास ७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे घोटी शहरातील अनेक जमीनमालक विस्थापित होणार आहेत.

ठळक मुद्देघोटी : शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली खासदारांची भेट

घोटी : मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी घोटी ग्रामपालिका हद्दीतील जवळपास ७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे घोटी शहरातील अनेक जमीनमालक विस्थापित होणार आहेत. या नागरिकांसह तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२४) माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली. खासदारांनी याप्रश्नी लवकरच शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल तसेच वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेण्याबाबतचे आश्वासन दिले.मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वेमार्गाचे रु ंदीकरण करण्याचे प्रस्तावित करून त्यासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रि या सुरू केली आहे त्यामुळे इगतपुरी तालुक्यातीळ रेल्वेमार्गालगतच्या गावांना भूसंपादनाच्या नोटीसा प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. यानुसार पाडळी, मुकणे अस्वली, नांदूरवैद्य, आदी भागासह घोटी शहराच्या मध्यातून हा मार्ग प्रस्तावित झाल्याने घोटी शहरातील रिहवाशांचे मोठे क्षेत्र जाणार आहे त्यामुळे घोटी शहराचे विभाजन होऊन अनेक ग्रामस्थ व शेतकरी उघड्यावर येणार आहे. या प्रस्तावित भूसंपादनाला नागरिकांचा विरोध आहे.या प्रस्तावित रेल्वे मार्ग रु ंदी करणाविरोधात इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी एकवटले असून त्यांनी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वखाली खा हेमंत गोडसे यांची भेट घेतली या भेटीत खासदार गोडसे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आलीदरम्यान यापूर्वीच रेल्वे विभागाकडे आधीच मोठ्या प्रमाणात भूसंपादन केलेले क्षेत्र आहे त्याच जागेतून रेल्वेने नवीन मार्ग व रु ंदीकरण करून स्थानिक शेतकरयांना दिलासा द्यावा. रेल्वेकडे रेल्वे लाईन लगत जमीन असल्याने नवीन भूसंपादन करण्याची गरज नसल्याचे खासदार गडसे यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच केंद्र व राज्यसरकार च्या अनेक प्रकल्पासाठी तालुक्याततुन मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना आता पुन्हा उध्वस्त करून देशोधडीला लावू नका असे नमूद केले. दरम्यान खासदार गोडसे यांनी याबाबत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह घोटीतील पदाधिकारी व शेतकºयांचे शिष्टमंडळ सोबत घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाºयांसह रेल्वेमंत्री ना पीयुष गोयल यांची भेट घेऊन आपले गाºहाणे त्यांच्यापर्यंत मांडू. अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरी