नाशिक : स्वयंपाकाच्या गॅसवर दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद होणार असून, गॅस सिलिंडरचे दर दरमहा चार रुपयांनी वाढण्याचे सरकारने दिलेले संकेत सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणार आहे. त्यामुळे दरमहा आर्थिक ताळमेळ बसविताना प्रत्येकालाच मोठी कसरत करावी लागणार आहे. भाववाढीऐवजी सिलिंडरची संख्या कमी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटी, वाढती महागाई यामुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला अजून कशाकशाचा सामना करावा लागणार आहे, असा सवाल केला जात आहे. याबाबत गृहिणी, व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला असता सरकारने सर्वसामान्यांचा विचार करावा, एका गोष्टीची दरवाढ लागू करताना किमान दुसºया गोष्टीतून तरी दिलासा द्यावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
सिलिंडर दरवाढीमुळे अडचणींमध्ये भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:57 IST