शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटच्या धडकेत चालकासह सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:55 IST

भरधाव बुलेटस्वाराने रस्ता ओलांडत असलेल्या सायकलस्वारास दिलेल्या धडकेत बुलेटचालकाचा जागीच, तर सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल कंपनीसमोरील चौकात घडली़ या अपघातात बुलेटस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : भरधाव बुलेटस्वाराने रस्ता ओलांडत असलेल्या सायकलस्वारास दिलेल्या धडकेत बुलेटचालकाचा जागीच, तर सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल कंप-  समोरील चौकात घडली़ या अपघातात बुलेटस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विठ्ठल महादू कडाळे हे नलिनी तांगडे (४०) यांच्यासोबत बुलेटने (एमएच १५ एफएल ३१३२) सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल कंपनीसमोर असलेल्या चौकातून भरधाव जात होते. त्यांनी रस्ता ओलांडत असलेला सायकलस्वार मिथुन निचेडी चव्हाण (२०) यास जोरात धडक दिली़ यामध्ये बुलेटचालक विठ्ठल कडाळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला,तर नलिनी तांगडे यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर दुखापत व सायकलस्वार मिथुन चव्हाण यांच्याही डोक्यास व कमरेला गंभीर दुखापत झाली होती़ पोलीस हवालदार रमेश दराडे यांनी या अपघाताबाबत सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़सातपूर पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी तत्काळ या तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी बुलेटचालक विठ्ठल कडाळे यांना तपासून मयत घोषित केले़, तर सायकलस्वार मिथुन चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

टॅग्स :Accidentअपघात