शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:57 IST

सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमध्ये असलेल्या एका बंगल्यात स्वयंपाकाच्या गॅसची रात्रीतून गळती झाल्याने, सोमवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात घरातील पगार कुटुंबातील पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. 

ठळक मुद्देपाच जखमी : सिडकोच्या खुटवडनगरमध्ये घडली दुर्घटना; घराचे नुकसान

नाशिक : सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमध्ये असलेल्या एका बंगल्यात स्वयंपाकाच्या गॅसची रात्रीतून गळती झाल्याने, सोमवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात घरातील पगार कुटुंबातील पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच, सातपूर केंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित पाण्याचा मारा करत लागलेली आग विझविली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खुटवडनगर येथील पगार कुटुंबातील  पुष्पा पगार या सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या नातवाला पेज तयार करून देण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता, घरात अगोदरच गॅसची गळती झालेली असल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, घरातील दरवाजे खिडक्या आणि भिंतीदेखील तुटल्या. खिडक्यांची तावदाने थेट अंगणात येऊन पडली होती, तसेच घराबाहेर असलेल्या वाहनांच्याही काचा फुटल्या आणि आजूबाजूंच्या घरांनाही हादरे बसल्याचे रहिवाशांनी सांगितले. या स्फोटात  पुष्पा बळीराम पगार त्यांचे पती बळीराम पगार, तसेच मुलगा अतुल पगार, मुलगी अश्विनी पगार, तसेच नातू रोहन व रुची हे सर्व जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गॅस गिझरचा स्फोट होऊन युवक मृत्युमुखी पडला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर गळती होऊन झालेल्या दुर्घटनेमुळे इमारतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या तर आजुबाजूच्या घरांमधील साहित्यांचे नुकसान झाले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात