शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी कारखान्यात सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:43 IST

हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्याजवळ ठेवलेले तीन गॅस सिलिंडरने पेटले व त्यांच्या स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला़ या घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

नाशिक/ पंचवटी : हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्याजवळ ठेवलेले तीन गॅस सिलिंडरने पेटले व त्यांच्या स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला़ या घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.  हिरावाडीतील शिवकृपानगर येथे राहणाºया केशव मकलू चौहाण यांचा पाणीपुरी बनविण्याचा व्यवसाय आहे. पाणीपुरी कारखाना अनधिकृत?हिरावाडीतील शिवकृपानगर येथे राहणाºया केशव चौहान या परप्रांतीयाने गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीच्या छतावर पाणीपुरी बनविण्याचा कारखाना थाटला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मनपा उद्यानालगत व भरवस्तीत इमारतीच्या छतावरच अनधिकृतपणे बांधकाम करून पाणीपुरी बनविण्यासाठी गॅस भट्टी पेटविली जाते़ महापालिकेने भरवस्तीत या कारखान्यास परवानगी दिलीच कशी, असा सवाल नागरिकांनी केला आहे.शिवकृपानगरमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ कारखानेशिवकृपानगर परिसरात काही परप्रांतीय भाडेतत्त्वावर घरे घेऊन घरातच गॅसभट्टी लावून विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे काम करतात़ भरवस्तीत विनापरवाना खाद्यपदार्थ बनविण्यासाठी भट्ट्या लावल्या जात असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़ मात्र याबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Fairजत्राNashikनाशिक