नाशिक : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ आॅक्टोबर गांधी जयंती हा दिवस ‘इंडियन सायकल डे’ म्हणून घोषित करावा यासाठी रविवारी (दि. १) नाशिक ते मुंबई अशी सायकल रॅली गोल्फ क्लब मैदान येथून रवाना झाली.या रॅलीमध्ये एकूण ६० सायकलिस्टने सहभाग नोंदविला असून, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, शहर अभियंता यू. बी. पवार ग्रीन स्पेसिअसचे किरण चव्हाण यांनी या रॅलीत सहभागी होत इगतपुरीपर्यंत आपला सहभाग नोंदवला. रविवारी गोल्फ क्लब मैदान येथून रवाना झालेल्या रॅली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भिवंडी फाटा येथे मुक्कामी थांबणार असून, रविवारी (दि. २) गेट वे आॅफ इंडियाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहेत.
‘इंडियन सायकल डे’साठी सायकलिस्ट मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:08 IST