शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना साथीतही सायक्लिस्ट फाऊंडेशनचा मदतीसाठी पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:55 IST

नाशिक : गत दशकापासून नाशकात मूळ धरलेल्या सायकल चळवळीने नाशकात सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच सातत्याने अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम करुन संघटनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना साथीच्या काळातही एक टनपेक्षा अधिक धान्य, किराणावाटप, कुठे रक्तदान, प्लाझ्मादान, कधी सायकलदान, कधी वह्या, पुस्तके दान,कधी औषधे वाटप तर कुठे जनजागृती यासह विविध उपक्रम करण्यात नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देनाशकात सायकलिंगला प्रोत्साहन गरजू हुशार विद्यार्थ्यांना सायकल्सचे वाटप

नाशिक : गत दशकापासून नाशकात मूळ धरलेल्या सायकल चळवळीने नाशकात सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच सातत्याने अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम करुन संघटनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना साथीच्या काळातही एक टनपेक्षा अधिक धान्य, किराणावाटप, कुठे रक्तदान, प्लाझ्मादान, कधी सायकलदान, कधी वह्या, पुस्तके दान,कधी औषधे वाटप तर कुठे जनजागृती यासह विविध उपक्रम करण्यात नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

जगभरात ०३ जून हा आंतरराष्ट्रीय सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांवर महामारीच्या तांडवामुळे आणि त्या अनुषंगाने असलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाचे सावट पडले आहे. मात्र, तरीही नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनतर्फे यंदादेखील सायकल दिनानिमित्त गरजू हुशार विद्यार्थ्यांना सायकल्सचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या काळातदेखील गरीब विद्यार्थ्यांना सायकली तसेच पुस्तके वाटप करण्यात आले. वाड्या पाड्यांवर जाऊन औषध वाटप तसेच कोरोनाची माहिती आणि खबरदारी यावर प्रबोधन केले. संघटनेच्या सदस्यांनी त्यांच्या वाढदिवशी दिलेल्या धान्याचे, किराणा सामानाचे वितरण वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बाल्याश्रम, कोरोना काळात अडचणीत असलेल्या कुटुंबांना, तुरुंगातून बाहेर आलेल्या पण हाती काम नसलेल्या बंदीवानांना, धंदा गोत्यात आलेल्या कलाकारांना करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या स्ट्रेट हॅन्डल ड्राईव्ह आणि सायकल फॉर चेंज यासारख्या कार्यक्रमात सहयोग दिला. त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे कारगिल दिन, मैत्रदिन, स्वातंत्र्य दिन, अवयवदान दिन, त्र्यंबकेश्वर फेरी, राष्ट्रीय क्रीडा दिन, शिक्षक दिन, हुतात्मा दिन, पत्रकार दिन, योग दिन, प्रजासत्ताक दिन ई. दिनाचे औचित्य साधून त्या दिवशी साजरे केले. या व्यतिरिक्त राष्ट्रीय मतदार दिन, कर्करोग, पर्यावरणपूरक गणेश पूजा, फटाकेरहीत दिवाळी या. विषयांवर जनप्रबोधन केले गेले. त्याशिवाय महिलांसाठी खास नवदुर्गा उत्सव, कोजागिरी, जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने आणि बहुसंख्येने साजरा केला गेला. त्यांच्यासाठी विशेष राईड्स ठेवून प्रोत्साहित केले जात आहे. यावर्षीदेखील शेगाव वारी उत्साहात झाली. तसेच शिवनेरी येथेदेखील लक्षणीय संख्येने सायकलस्वार जाऊन छत्रपतींच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊन आले. सायकलिंग, समाज प्रबोधन, गरजूंसाठी सहाय्य, प्रशासनाच्या उपक्रमात सहभाग, पर्यावरण संवर्धन, विविध विषयांवर जनजागृती अशा अनेक उपक्रमाद्वारे एनसीएफची वाटचाल कोरोना काळातही सुरुच असल्याचे नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :NashikनाशिकCyclingसायकलिंग