शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात रविवार होणार ‘सायकलवार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:55 IST

नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजावी आणि नागरिकांनी अधिकाधिक सायकलचा वापर करावा, तसेच पर्यावरणाचा संदेश देत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कालपासून ‘रविवार सायकल वार’ या उपक्र माला सुरुवात करण्यात आली. रविवारी (दि.१२) सकाळी ७ वाजता भोसला चौक येथे सुरू झालेली सायकल राईड कॉलेजरोड मार्गे जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल मार्गे पुन्हा भोसला चौकात येऊन पार पडली.

नाशिक : नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजावी आणि नागरिकांनी अधिकाधिक सायकलचा वापर करावा, तसेच पर्यावरणाचा संदेश देत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कालपासून ‘रविवार सायकल वार’ या उपक्र माला सुरुवात करण्यात आली. रविवारी (दि.१२) सकाळी ७ वाजता भोसला चौक येथे सुरू झालेली सायकल राईड कॉलेजरोड मार्गे जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल मार्गे पुन्हा भोसला चौकात येऊन पार पडली.प्रत्येक रविवारी शहरातील एका ठराविक भागामध्ये सायकल राईड घेतली जाणार आहे. त्या परिसरातील नागरिकांना नाशिक स्मार्ट सिटी आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने या सायकल राईडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रविवार सायकल वार राईडसाठी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्मार्ट सिटीचे कंपनीचे सचिव महेंद्र शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर राईडला सुरुवात झाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर अहेर आणि त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. या राईडमध्ये स्मार्ट सिटीचे उपमहाव्यवस्थापक विनोद पाटील, प्रकल्प व्यवस्थापक हर्षद वाघ,जनसंपर्कअधिकारी प्रशांत चिडे, दुर्गेश ओझरकर, अभिषेक जैन, सचिन मोरे, विशाल उगले, श्रीकांत जोशी, नीता नारंग, नंदकुमार पाटील, डॉ. मनीषा रौंदळ, सोफिया कपाडिया, हिमानी पुरी, रविकिरण लोखंडे, दीपक भोसले, रवींद्र दुसाने, नाना फड, संजय सांगळे आदी या राईडमध्ये सहभागी झाले होते.सर्वांना सहभाग खुलासायकल आपल्याजवळ असली किंवा नसली तरीही या राईडमध्ये सहभागी होऊ शकत असल्याचे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले. ज्यांच्याजवळ सायकल आहे, ते सायकल घेऊन येऊ शकतात. ज्यांच्याजवळ सायकल नाही, त्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली सायकल राईडच्या ठिकाणी सायकल घेता येईल, असेही नमूद करण्यात आले. त्याशिवाय प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीला शहरातील निर्धारित सायकलिस्ट फेरी मारून म्हणजेच ‘सिटी रायडिंग’च्या माध्यमातून सायकलिंगबाबत जनजागृती करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकCyclingसायकलिंग