नाशिक : शहरात सायबर चोरट्यांनी मागील पाच महिन्यात अधिकच लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षभरात एकूण ९५ नागरिकांना विविध आमीष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बॅँक खात्यातून हजारो ते लाखो रूपयांचा अपहार करत एकूण २२ लाख ९७ हजार १२९ रूपये इतकी रक्कम परस्पर ऑनलाइन लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२२) समोर आला.सायबर चोरट्यांनी विविध बॅँकांच्या ग्राहकांशी संपर्क साधत त्यांना क्रेडिटकार्डची रक्कम मर्यादा वाढवून देणे, रिवॉर्ड पॉइंट घेणे, कॅशलेस मेडिकलचा लाभ मिळवून देणे असे विविध आमीष दाखवून विश्वास संपादन केला तसेच मुळ कागदपत्रांची पडताळणी, डेबीट, क्रेडिट कार्डांचे व्हेरीफिकेशन करायचे सांगून सायबर चोरट्यांनी४ जुलै २०१९ ते १४ जुलै २०२०या वर्षभराच्या कालावधीत नागरिकांची बॅँक खाती हळुहळु रिती करण्याचा सपाटाच लावल्याचे समोर आले आहे. यामुळे नाशिक शहर सायबर पोलीस दलदेखील हादरले आहे. या गुन्हेगारांची ‘लिंक’ शोधून पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान सायबर पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
सायबर चोरट्यांचा डल्ला : ९५ नाशिककरांच्या बॅँक खात्यातून २३ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:02 IST
४ जुलै २०१९ पासून अद्यापपावेतो प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांनुसार एकूण ९५ गुन्हे सायबर पोलिसांकडून मंगळवारी (दि.२१) दाखल केले गेले.
सायबर चोरट्यांचा डल्ला : ९५ नाशिककरांच्या बॅँक खात्यातून २३ लाखांची लूट
ठळक मुद्देविविध आमीष दाखवून केला हात साफसहा महिन्यांत साडेतीनशे नागरिकांना गंडासायबर पोलिसांपुढे उभे राहिले आव्हान