दाभाडी : परिसरातील रस्त्यांवर काटेरी बाभळीचे अतिक्रमण वाढले असून, रस्त्यालगतच्या बोरीबाभळींमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.दुचाकीस्वारांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत कुणीच लक्ष देत नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे. संबंधितांनी परिसरातील काटेरी व बाभळी हटवावी, अशी मागणी होत आहे. येथील स्थानिक रस्त्यांचे डांबरीकरण होताना नऊ ते दहा फुटापर्यंतचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे रस्त्यालगत दोन्ही बाजूस चार ते पाच फुटापर्यंतची जागा शिल्लक राहिली. त्यामुळे वीस फुटाचा रस्ता दहा फुटाचा झाला. आजूबाजूला बोरीबाभळीचे साम्राज्य वाढले. त्यामुळे रहदारीला मोठा त्रास आहे. मात्र प्रशासन याबाबीत निष्क्रिय दिसून येत आहे. रस्त्यालगतची झाडे दिवसेंदिवस मजबूत होत असून, त्यांची वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. वाड्यावस्त्यांनादेखील हाच रस्ता वापराचा आहे. (वार्ताहर)त्याबाबतीत जवाहरनगरकडून आघार रस्ता ज्वलंत उदाहरण दिसून येत आहे. दोध्याड नदी पुलावरील बाभळीचे साम्राज्य त्याचे बोलके उदाहरण आहे, तर सरकारी दवाखान्याजवळ तर अतिरेकच बघायला मिळतोय. त्यासंदर्भात शासकीय यंत्रणेने त्वरित योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी गणेश निकम, किशोर निकम यांनी केली आहे. (वार्ताहर)
दाभाडीच्या रस्त्यांवर काटे
By admin | Updated: December 4, 2015 21:57 IST