शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 6:18 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६१ ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पडले. आता सोमवारी (दि.१८) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून जनतेला मात्र निकालाची उत्सुकता लागली आहेत.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : येवला तालुक्यात उमेदवारांमध्ये धाकधुक सुरु

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६१ ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पडले. आता सोमवारी (दि.१८) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून जनतेला मात्र निकालाची उत्सुकता लागली आहेत.तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीने निवडणुकीचे वातावरण बदलून टाकले काहींनी तर आपलाच विजय निश्चित असल्याचे घोषित करून टाकले तर काही उमेदवारांनी सोशल मीडियावर आपलाच विजय नक्की असल्याचे वृत्त झळकविले आहे.ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळते. कोरोना विषाणूच्या लोकडाऊन नंतर मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक शांततेत पार पडल्या.कुठे समझोता पद्धतीने तर कुठे बिनविरोध निवड, अश्या विविध पद्धतीने यंदाच्या निवडणुकीत गावागावातील राजकीय मंडळींनी समजदारी दाखवून निवडणूक पार पडली, तर काही ठिकाणी भावा-भावात, सासू सुनामध्ये देखील चुरस पहायला मिळाली.या निवडणुकीत नागरिकांनी दाखविलेला उत्साह बघता ग्रामपंचायत निवडणूक कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडली.ग्रामीण भागात यंदा पावसाळा चांगला झाल्या असल्याने शेती कामांची लगबग जोमाने सुरू होती, त्यात मजुरांचा तुटवडा व प्रचार ताफा घेऊन शेतामध्ये उमेदवारांना मोठ्या अडथळ्यांची शर्यती पार करीत प्रचार करावा लागला. पॅनल निर्मिती करतांना तरुण कार्यकर्त्यांची मनधरणी करतांना प्रस्थापित राजकीय मंडळींना देखील बरीच कसरत करावी लागली.शेतीच्या कामाची लगबग आणि निवडणुकीचे रणशिंग एकाच वेळी फुंकले गेल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली तसेच फॉर्म भरण्यापासून ते सादर करण्यापर्यंत रात्रीचा दिवस उमेदवारांना करावा लागला, ऑनलाइन फॉर्म भरताना मंदावलेले नेटवर्क यामुळेही उमेदवारांचा वेळ वाया गेला त्यामुळे यावर्षीची निवडणूक कोरोनाच्या सावटाखाली पार मात्र शांततेत पार पडली.- सुनिता कदम, उमेदवार.येवला तालुक्यातील गावे आणि त्या गावांना झालेली मतदान टक्केवारी मध्ये देवळाने८९, अंगुलगाव ८१, तळवाडे ७८, भुलेगाव ८७, नागडे ८०, मातुलठाण ८१, बल्हेगाव ८४, बोकटे ८६, आहेरवाडी ८६, भारम ८६, रेंडाळे ९२, अनकुटे ८६, डोंगरगाव ८१, पिंपळखुटे बुद्रुक ८८, खामगाव ८८, ममदापुर ८५, खिर्डीसाठे ८०, पन्हाळसाठे ८८, धामोडे ८२, उंदिरवाडी ८५, निमगाव मढ ९१, नांदूर ८८, गणेशपुर ९१, कोळम बुद्रुक ८३, अंगणगाव ९०, धुळगाव ८४, आडगाव रेपाळ ९३, सत्यगाव ७९, नगरसुल ७७, विसापूर ८८, साताळी ८७, बाभूळगाव बुद्रुक ८८, जळगाव नेऊर ७९, आंबेगाव ८९, वाघाळे ८८, मुखेड ७७, अनकाई ७८, पाटोदा ८४, देशमाने बुद्रुक ८४, अंदरसुल ७८, कोटमगाव खुर्द ८७, राजापूर ७९, नेऊरगाव ९०, पुरणगाव ९०, सातारे ८९,एरंडगाव बुद्रुक ९३ मुरमी ९५, पिंपळगाव लेप ९०, महालखेडा पाटोदा ८६, सोमठाणदेश ८८, ठाणगाव ९०, देवठाण ८७,धामणगाव ८६, विखरणी ९१, सायगाव ८२, खैरगव्हाण ८८, गुजरखेडे ८५, भाटगाव ९४, खरवंडी ८७, रहाडी ८९, कोळगाव ८७.

(फोटो १६जळगाव नेऊर)जळगाव नेऊर येथील लक्ष्मीबाई सोनवणे यांनी या ९५ वषार्च्या वृध्देने मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक