शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात होणार सर्व कलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 8:30 PM

नाशिक : साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत.

ठळक मुद्देनृत्य, नाट्य, लोककला, संगीत या सर्व कलांचा तसेच स्थानिक कलांचा व्यापक समावेश हवा,

नाशिक : साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत.                   त्यात नृत्य, नाट्य, लोककला, संगीत या सर्व कलांचा तसेच स्थानिक कलांचा व्यापक समावेश हवा, त्यामुळे कार्यक्रम दर्जेदार व सर्वसमावेशक तसेच रंजक होईल अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाची आखणी सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या बैठकीत करण्यात आली.साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांना खूप महत्त्व असते.

या बैठकीला समिती प्रमुख विनोद राठोड यांच्यासह अनेक कलाकार सभासद उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम निवड, कालावधी, व्यावसायिक व स्थानिक कलाकार व कार्यक्रम निवड व कलाकारांचे मानधन वगैरे विषयांवर चर्चा झाली. कलाकारांच्या निवास, भोजन व्यवस्था, व्यासपीठ व्यवस्था, ध्वनी व्यवस्था आदी बाबींवर चर्चा झाली.

सांस्कृतिक कार्यक्रम समितीतर्फे एखादा कार्यक्रम करायचा झाल्यास त्याचे स्वरूप, सराव आणि रंगीत तालीम यांचा आराखडा करण्याची आणि खर्चाचे अंदाजपत्रक बनविण्याची सूचना करण्यात आली. यावेळी संमेलनाचे सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक व व्यावसायिक असे २ भाग आहेत. त्या दृष्टीने रूपरेषा आखावी असेही त्यांनी सांगितले.

सतीश वाणी यांनी नाशिकची ओळख होईल व महत्त्व पटेल असा प्रयोग सादर करावा अशी सूचना केली. रवी जन्नावार यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी प्रियांका बोराडे, प्रज्ञा कुलकर्णी, साक्षी बोराडे, जयंत ठोमरे, वृषाली भट, डॉ. शैलेंद्र गायकवाड उपस्थित होते.लोगो 

टॅग्स :NashikनाशिकMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन