शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फ क्लबच्या विषयावरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:43 IST

राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले.

नाशिक : राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले; मात्र भानसी यांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता महासभेपुढे आलेल्या या विषयाला मंजुरी दिली. यावेळी सिडकोतील नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क सुधारणासाठी निधी मिळत नाही तोपर्यंत सभागृहात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने भाजपाची मोठी अडचण झाली.यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोत थिमबेस क्रिडांगणासाठी असलेल्या दोन कोटी रुपयांचा निधी पेलिकन पार्कसाठी देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही शहाणे यांनी लेखी पत्र दिल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांना सिडकोतील नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मोठ्या मुश्किलीने भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढली. दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून गोल्फ क्लब येथे सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी शासनाचे पाच कोटी तर महापालिकेचे सहा कोटी २७ लाख रुपये देण्यावरून विरोधी पक्षाचे अजय बोरस्ते तसेच गजानन शेलार यांनी कडाडून विरोध केला. शासनाने पार्किंगसाठी दिलेला िनधी गोल्फ क्लबसाठी वळविण्याचे कारण काय? असा प्रश्न करीत महापालिकेत लुडबुड करणाऱ्या आमदार म्हणून फरांदे यांची हेटाळणी केली. तथापि सदरचा विषय मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका