शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत गर्दीचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : शहरात विशेषत: पंचवटी परिसरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत असताना ...

ठळक मुद्देवाहनांच्या रांगा सायंकाळचे लिलाव दुपारीच

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : शहरात विशेषत: पंचवटी परिसरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत असताना दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रोजच शेतकरी, खरेदीदारांची मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाची साखळी आणखी घट्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या गाजर, मिरची तसेच घेवडा यांसह अन्य फळभाज्यांचे लिलाव दुपारच्या सत्रात करण्यात आल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले असून, बाजार समितीत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.नाशिक बाजार समितीत व्यापारी, बाजार समिती पदाधिकारी, हॉटेल चालक आणि अन्य काहींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने बाजार समिती काही दिवसांपूर्वी तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने नियोजन करणे आवश्यक होते. मात्र त्यात कोणताही फरक पडला नाही. गर्दीचे नियोजन तसेच बाजार समितीत येणाऱ्या व्यक्तींची तपासणी आदी बाबींबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण वाढून त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी पुन्हा एकदा बाजार समितीचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट झाले. सध्या पावसाचे वातावरण तयार झाल्याने त्याचबरोबर गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळ आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला तयार भाजीपाला आणण्यास सुरुवात केली असून, शुक्रवारी सकाळपासूनच बाजार समितीत व बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या. अशातच भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनीही चांगला भाजीपाला खरेदी करण्यासाठी शेतक-यांशी बोलणी करून लिलावाला सुरुवात केली. अशातच किरकोळ भाजीपाला खरेदी करणाºयांचीही गर्दी झाल्याने बाजार समितीतील गर्दीचे नियोजन कोलमडले. वाहने आत-बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार त्यातही नियोजन नसल्याने किती तरी वेळ वाहनांच्या रांगा कायम होत्या. दरम्यान, दुपारी २ वाजता पावसाला सुरुवात होताच, बाजार समितीत एकच धावपळ उडाली. भाजीपाला विक्रेते व खरेदीदारांनी पावसापासून माल बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी