आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:27 PM2021-05-06T23:27:19+5:302021-05-07T01:02:13+5:30

मुखेड : येथील आरोग्य केंद्रात गुरुवारी नागरिकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोजक्या लस शिल्लक असल्याने अनेक नागरिकांचा हिरमोड झाला.

Crowd for vaccination at Mukhed Health Center | आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

Next
ठळक मुद्दे १८ वर्षांवरील युवकांनीही गर्दी केली

मुखेड : येथील आरोग्य केंद्रात गुरुवारी नागरिकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोजक्या लस शिल्लक असल्याने अनेक नागरिकांचा हिरमोड झाला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जाधव व बाविस्कर यांनी व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून ४५ वर्षे वयाच्या नागरिकांनीच लसीकरणासाठी उपस्थित राहावे, असे कळविले होते. परंतु, तेथे १८ वर्षांवरील युवकांनीही गर्दी केली होती. मुखेड व परिसरातील सत्यगाव, महालखेडे ,मानोरी, देशमाने, भिंगारे आदी गावांतील नागरिक लसीकरणासाठी उपस्थित होते. लसींचे दोनशेच डोस उपलब्ध होते. तुलनेने गर्दी जास्त असल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले.

 

Web Title: Crowd for vaccination at Mukhed Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.