पंचवटी परिसरात तपोवन, म्हसरूळ, मखमलाबाद, हिरावाडी, कालिकानगर, मायको दवाखाना या ठिकाणी शनिवारच्या दिवशी सकाळी नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी रांगा लावलेल्या होत्या. तब्बल चार ते पाच दिवसांनी कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रावर प्लस घेण्यासाठी गोंधळ उडाला. लसीकरण केंद्रावर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या जवळच्या माणसांना लस मिळावी यासाठी गर्दी केली होती. शनिवारच्या दिवशी नाशिक शहरात कोविशिल्ड लस दाखल झाली असली तरी लस कमी आणि लसीकरण करण्यासाठी आलेले नागरिक जास्त अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने गोंधळ उडाला. प्रशासनाचे नियोजन चुकल्याने त्याचा फटका लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसला.
इन्फो===
इंदिरा गांधी रुग्णालयात शुकशुकाट
महापालिकेच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात असल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात अत्यंत तुरळक अशी गर्दी होती. मनपाच्या अन्य लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाली होती तर इंदिरा गांधी रुग्णालयात शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.
(फोटो १४ पंचवटी)